Duration 1:33

मुंबईत जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांबरोबर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली

590 watched
0
6
Published 31 Jul 2023

दि. ३१.०७.२०२३ : जागतिक बँकेच्या सहकार्याने यापूर्वीही राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभारले गेले असून भविष्यातही विविध प्रकल्प उभारले जातील, पण केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे तर इतरही क्षेत्रांत संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांबरोबर काल मुंबईत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या सादरीकरणानं जागतिक बँकेचं शिष्टमंडळ प्रभावित झालं असंही मुंख्यमत्री म्हणाले. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून देशाला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही या परिषदेची स्थापना केली आहे. परिषदेनं केलेल्या शिफारशींचा अभ्यास जलदगती समितीमार्फत करण्यात येईल तसंच कालबद्ध अंमलबजावणीसाठी पावले उचलली जातील. असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. जागतिक बँकेसोबत राज्याची भागीदारी महाराष्ट्रातील लोकांचं जीवनमान अधिक सुधारण्यासाठी उपयोगी पडेल, असं सांगत, कृषी सुधारणा, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि सर्वांसाठी घरे यासाठी उचललेल्या काही महत्त्वाच्या पावलांची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला मिळणारं पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवणं तसंच पूर्व आणि पश्चिम विदर्भातील नदीजोड प्रकल्पातून या जिल्ह्यांमधील दुष्काळ संपवणं या बाबींना प्राधान्य असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणंवीस यांनी सांगितलं. राज्यात राबवण्यात येत असलेल्या नदी जोड प्रकल्पाविषयी जागतिक बँकेच्या सदस्यांना माहिती देण्यात आली. #DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya #DDNewsMarathi Official YouTube channel of DD Sahyadri News. Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster. DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins. Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins. Watch our popular bulletins 8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. Follow us on : Youtube -- /@ DDSahyadriNews Twitter -- https://twitter.com/ddsahyadrinews Instagram -- https://www.instagram.com/ddsahyadrinews News | Breaking | Current Affairs | India | Maharashtra | Marathi | Batmya | Politics | LIVE | Update | Viral Video | Daily News Update #DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya #DDNewsMarathi

Category

Show more

Comments - 1